ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल २ कोटी ३८ लाख ८७ हजार ९५०रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

ठाणे पोलिसांची

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । अंमली पदार्थांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे करत तब्बल २ कोटी २८ लाख ८७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यात २ किलो ३७४ ग्रॅम वजनाचा हायब्रीड गांजा (विड्स) सह १९ एमडीएमए गोळ्यांचा समावेश आहे. शनिवारी (दि.२४ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास पोलिसांनी मुंब्र्यातील सिम्बॉयसिस शाळेच्या समोर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये मूळ राजस्थानातील राहिवासी सुमित राजुराम कुमावत (वय २१) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, ठाणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ठाणे पोलिसांना हायब्रीड गांजा आणि एमडीएमए टॅबलेट्स या अंमली पदार्थांची विदेशातून भारतात तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार ठाणे पोलिसांनी शनिवारी दि. २४ ऑगस्ट रोजी सापळा रचून थेट कारवाई केली. मुंब्रा येथील जुना टोलनाका, बायपास रोडवरील सिम्बॉयसिस शाळेच्या समोरून बोरिवलीतील तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ कोटी ३७ लाख ४० हजार रुपये किमतीचा २ किलो ३७४ ग्रॅम वजनाचा हायब्रीड गांजा आणि १ लाख ४७ हजार रुपयांच्या १९ एमडीएमए टॅबलेट्स आढळल्या. पोलिसांनी तब्बल २ कोटी ३८ लाख ८७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सपोनि निलेश मोरे, सपोनि सोमनाथ कर्णवर पाटील, पोउपनि राजेंद्र निकम, पोउपनि दिपक डुम्मलवाड, पोहवा शिवाजी रावते, हरीश तावडे, संदीप चव्हाण, अभिजीत मोरे, अमोल पवार, अमोल देसाई, हुसेन तडवी, अजय सपकाळ, अमित सपकाळ, नंदकिशोर सोनगिरे, गिरीश पाटील, पोशि आबाजी चव्हाण, चापोना अनुप राक्षे, मपोहवा शिल्पा कसबे, मपोशि कोमल लादे यांनी यशस्वीरित्या केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here