डिजिटल अरेस्टची धमकी देवून वृध्द महिलेला सव्वाकोटी लूटणा-यांना जळगावातून अटक

cyber-thief
file photo

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । वृद्धेला डिजिटल अॅरेस्ट करण्याची धमकी देणाऱ्या दोघांना जळगावमधून अटक करण्यात आली आहे. या आधुनिक चोरांनी डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देत वृद्धेला तब्बल सव्वाकोटींना गंडा घातला होता.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे जळगावमधून रोहित संजय सोनार आणि हितेश पाटील यांना अटक केली.

तक्रारदार महिला ७२ वर्षीय असून ती पश्चिम उपनगरात राहते. ८ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तिला मुंबईसह दिल्ली पोलीस, सीबीआय आणि मुंबई उच्च न्यायालयातून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरांनी कारवाईची भीती दाखवली होती. मनी लॉड्रिंगसह तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये तिच्या सहभाग उघडकीस आला असून तिची चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई होईल असे सांगून तिला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगितले.
फोनवरील या धमकीने महिला घाबरून केली. घराबाहेर जाता येणार नाही, कोणाशी संपर्क साधता येणार नाही असे सांगून नियमांचे उल्लघंन केल्यास घरातून अटक करण्याची धमकी या चोरांनी दिली होती. त्यानंतर तिच्या बँक खात्याची माहिती तिच्याकडून घेतली आणि विविध बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याची जबरदस्ती केली. अटकेच्या भीतीने तिने या चोरट्यांनी सव्वाकोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आला.
सायबर सेल पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर तोतयागिरी करुन फसवणुक करणे, आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने जळगावमधून रोहित सोनार आणि हितेश पाटील यांना ताब्यात घेतले. तपासात काही रक्कम रोहितच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले. या खात्याची माहिती हितेश पाटीलने विदेशात वास्तव्यास असलेल्या सायबर चोरांना दिली होती. ही रक्कम संबंधित चोरांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर या दोघांनाही ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर दोघांनाही चौकशीसाठी मुंबईत आणले. वांद्रे न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here