छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी सुजित खंडाळे) । येथील कुशल मॅटरनिटी होम सिडको एन ७ बजरंग चौक येथे घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डॉ. तपन निर्मल प्रदीप, डॉ. निर्मला आसोलेकर, कुशल मॅटर्निटी होम एन ७ बजरंग चौक सिडको अशी गुन्हा दाखल झालेले आरोपी डॉक्टरांची नावे आहेत. वैभव देविदास खैरे रा. विश्रांती नगर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
वैभव खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, श्वेता खैरे या गर्भवती असल्याने ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी फिर्यादीची पत्नी श्वेता खैरे यांना प्रसुतीसाठी कुशल मॅटर्निटी होम येथे दाखल केले होते. श्वेता यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयातील डॉक्टरांनी काळजीपूर्वक उपचार न करता हलगर्जीपणा केला. त्यामुळे प्रसुतीदरम्यान फिर्यादीच्या पत्नीचा मृत्यू झाला. फिर्यादी मयत श्वेता यांच्या पती वैभव यांनी आरोप पतीने फिर्यादीत केला आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता या महिलेला रुग्णालयात आणण्यात आलं. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता या महिलेने एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर पत्नीची प्रकृती ठीक होती. तिला दुसऱ्या रुममध्ये हलवण्यात आलं. तेव्हा महिला शुद्धीवर होती. मात्र, पाच-दहा मिनिटांत ती बेशुद्ध पडली. तेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांना सांगण्यात आलं. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर काहीही केलं नाही. त्यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आली. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सिडको पोलिस पुढील तपास करीत आहेत.







