महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिका-यांच्या हस्ते साई संस्थान सोसायटीच्या गणरायाची आरती

साई संस्थान

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) । साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख रोहिदास माळी,शिर्डी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश येसेकर यांसह पोलिस बांधवांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला

यावेळी काका कोयटे यांनी जवळपास तासभर थांबून साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन पोपटराव कोते,सचिव विलास वाणी आणि संचालक मंडळाकडून संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली व संस्थेचा चालू वर्षी असलेला नफा तसेच सभासदांसाठी संस्थेच्या वतीने राबविले जात असलेले उपक्रम ऐकून चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाचे विशेष कौतुक करत या संस्थेचे सभासद भाग्यवान असल्याचे म्हटले व येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यातल्या एम्प्लॉइज को ऑपरेटिव्ह सोसायटीच अधिवेशन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या उपस्थितीत लातूर येथे आयोजित केले असून साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी काका कोयटे यांनी केली तर राज्यातील पाच को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्तृत्ववान चेअरमन ची निवड आम्ही करणार असून बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून पहिली निवड ही चेअरमन विठ्ठल पवार यांची करत असल्याचे काका कोयटे यांनी जाहीर केले व सहकार क्षेत्रातील दिग्गज अभ्यासु ओळखले जाणारे काका कोयटे हे अतिशय रास्त दरात उच्च प्रतीची सोसायटीच्या पाण्याची बाटली,पिशवी तसेच पेढ्यांचा बॉक्स आवर्जून आपल्या सोबत घेऊन जाण्यास विसरले नाहीत.
यावेळी संचालक मिलिंद दुनबळे रवींद्र गायकवाड रामा गागरे तुळशीराम पवार व सचिव विलासराव वाणी, सहसचिव संभाजी कोते, विजय शिंदे नवनाथ थोरे देविदास आसने रमेश वाघे सुनील चिकने राजेंद्र खर्डे मंगेश कुलकर्णी व पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here