मराठा समाज आयुध निर्माणी देहूरोडतर्फे एक वेळ जेवणाचे वाटप

मराठा समाज

पुणे (महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी गिरीश पवार) । आयुध निर्माणी देहूरोड येथील मराठा समाज बांधवामार्फत मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे जाणाऱ्या समाजबांधवाना रात्री प्रवासादरम्यान खायला बिस्कीट पुडे व चिक्कीचे वाटप करण्यात आले.

दि 29 ऑगस्ट पासून श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण सुरू केलेले आहे. तरी मुंबई येथे आंदोलन करताना जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये म्हणून महाराष्ट्रभरातून विविध संघटनांच्या वतीने त्यांना पिण्याचे पाणी, जेवण, नाश्ता हे पुरवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या हेतुला साध्य करण्यासाठी तसेच आंदोलनात सहभागी झालेल्यांवर उपासमार येऊ नये म्हणून मराठा समाजासोबत इतरही बरेचसे समाज त्यांना खाण्यासाठी भरपूर प्रकारे अन्नदान करून मदत करत आहेत.यासोबत विविध अशा संघटनांनी डॉक्टरांमार्फत गोळ्या- औषधे, छत्री, रेनकोट, पाणी बाटली अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.
आयुध निर्माणी देहूरोड मधील मराठा समाजातील कर्मचाऱ्यांनी आपण समाजाच्याच देण लागतो या हेतूने पाचशेच्यावर एक वेळेस चे जेवणाची पाकिटे मुंबई मधील आंदोलनात सहभागी व्यक्तींना पार्सल पाठवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here