मराठा आंदोलनाचा मुंबईकरांना फटका; मराठा आंदोलकांनी लोकल अडवली

मराठा आंदोलन

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा फटका मुंबईतील नोकरदारा वर्गाला होत असल्याचं आज स्पष्ट झालं आहे. याचं कारण म्हणजे मराठा आंदोलकांनी आज मोटरमोनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रेल्वे ठप्प झाल्याने रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. दादर, कुर्ला, स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांमुळे लोकल ठप्प झाल्या आहेत. प्रवासी जागच्या जागी अडकले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स रेल्वे स्टेशनवर आंदोलकांची हुल्लडबाजी पहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्टेशनमध्ये रेल्वे रुळावर आंदोलक उतरले. आंदोलकांमुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्टेशनवर लोकल ट्रेन खोळंबल्या आहेत. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्टेशनच्या पुढे सर्व स्थानकांवर थांबलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्रामुख्याने दादर, कुर्ला, स्टेशनवर प्रवासी जागच्या जागी अडकले आहेत. रेल्वे स्थानकावर गोंधळ घालू नये अशा सूचना मनोज जरांगे यांनी केल्या आहेत. जरांगेंच्या सूचनांना आंदोलकांची केराची टोपली दाखवली आहे. सीएसटीमच्या प्लॅटफॉर्मवर शड्डू ठोकत आंदोलक कुस्ती, कबड्डी, खोखो सारखे खेळ खेळत आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींशी असभ्य वागणुकीचा निषेध व्यक्त होतोय. आंदोलनाचं वार्तांकन करताना महिला पत्रकार आणि इतर माध्यम प्रतिनिधींना वारंवार गैरवर्तन आणि असभ्य वागणुकीला तोंड द्यावं लागतंय. मुंबई मराठी पत्रकार संघाकडून घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. जरांगेंनी त्वरित अशा गैरवर्तनासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघाने केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here