इंदापूर (प्रतिनिधी गणेशराव धनवडे) । पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ,पुणे जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांचे वतीने देण्यात येणाऱ्या “जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार” लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी मधील जेष्ठ अध्यापक राजेंद्र रणमोडे यांना जाहीर झाला आहे.
सदरचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ १४ सप्टेंबर २०२५ रोजी तुलसी पॅलेस मंगल कार्यालय आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यापुर्वी जेष्ठ अध्यापक राजेंद्र रणमोडे यांना नेपाळ येथे “हिंदी आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार” व गोवा हिंदी अकादमी गोवा पुरस्कृत “महाराष्ट्र राज्यस्तरीय हिंदी प्रचारक संमेलात श्री.रणमोडे यांना “भाषारत्न पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले. होते. जेष्ठ अध्यापक राजेंद्र रणमोडे हे पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे उपाध्यक्ष, इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष, श्री.शिवाजी विद्यालय शिक्षक सोसायटी बावडाचे माजी चेअरमन व निमसाखर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत.
त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार ते करीत असलेल्या निस्वार्थ कामाची पोचपावती आहे.राष्ट्रभाषा हिंदी प्रचार, बहिस्त हिंदी परीक्षा,तालुकास्तरीय हिंदी अध्यापक संघ असे विविध प्रकारच्या कार्यक्रमात आपला अनमोल सहभाग आहे. विद्यार्थी हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या, चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचारअसणाऱ्या अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिवाजी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच उपाध्यक्ष मनोजराव पाटील, उदयसिंह पाटील व सचिव किरणकाका पाटील, विद्यालयाचे प्राचार्य भीमराव आवारे यांनी श्री. रणमोडे यांचे अभिनंदन केले आहे.







