लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्काराने पंकज भंगाळे यांचा गौरव

पंकज भंगाळे

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) । ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु!! येथील शिक्षक पंकज भंगाळे यांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली मेहनत, तसेच समाजोपयोगी उपक्रमांत दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार भंगाळे सरांना जाहीर करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. शालेय शिक्षण अधिक परिणामकारक व गुणात्मक होण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भंगाळे सरांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षकवृंद, पालक तसेच माजी विद्यार्थी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here