पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रीची पूजा आणि आरती माजी प्राचार्य रविंद गारटकर यांचा परिवार आणि हमीद भाई आतार यांच्या परिवाराच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर पवित्र उमरा हज यात्रेस हमीदभाई आतार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मुसलमान धर्मामध्ये हज यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते जन्मास येऊन एकदा तरी हज करून महंमद पैगंबरांचे आशीर्वाद घेणे हे जीवनाचे मोठे सार्थक मानले जाते.सौ सायराभाभी आतार, हमीदभाई आतार आणि त्यांची कन्या यांचा शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला आणि शंकरराव पाटील ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश देसाई सर, ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण, शंकरराव पाटील कोपीवरच्या शाळेचे प्रमुख भारत बोराटे, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी कर्मचारी वर्ग विद्यार्थी वर्ग आरतीसाठी उपस्थित होता. यावेळी श्री.गारटकर यांच्या वतीने सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.







