इंदापूर (प्रतिनिधी) । भिगवण शहरात गुरुवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन गटांत झालेल्या हाणामारीने पोलीस ठाण्याच्या समोरच राडा झाला. हॉटेलमधील पैशाच्या व्यवहारातून पेटलेला वाद थेट शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीपर्यंत पोहोचला.या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी पोलीस हवालदार अन्सार शेख यांच्या फिर्यादीवरून १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी बीएनएस कलम १९४(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०, ११२, ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या हाणामारीत महेंद्र नानासो जगताप (३८, डाळज नं. ३), निलकंठ नरहरी वाकळे (४६, डाळज नं. ३), भरत संतोष भोसले (२६, डाळज नं. १), केतन नाथासो कुताळ (३३, भादलवाडी), देविदास बाळासो खारतोडे, योगेश तात्याराम खारतोडे (३४, विठ्ठलवाडी कळस), निलेश मनोहर हगारे (३४, डाळज नं. २), अमर सुरेश जगताप (३४, डाळज नं. २), तन्मय विलास नाळे (१९, पोंधवडी), विशाल मारूती गाडेकर (२४, पोंधवडी), महेश लक्ष्मण खारतोडे (४०), संपत ज्ञानदेव खारतोडे (२२), नितीन जगन्नाथ खारतोडे (२२), सचिन जगन्नाथ खारतोडे (३०, सर्व रा. पोंधवडी, ता. इंदापूर) यांच्याशिवाय इतर ७ ते ८ अज्ञात व्यक्तींचा देखील या राड्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







