मीरा भाईंदरमध्ये टारझन ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलिसांची धाड; अनेक मुलींना गुप्त कपाटातून काढलं बाहेर

टारझन ऑर्केस्ट्रा बार

मुंबई (संपादक सुनिल पाटील) | काशिमीरा पोलिसांनी टारझन ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकत आरोपींना रंगेहात पकडलं. या कारवाईत ५ मुली या चक्क एका कपाटात सापडल्या. याआधीसुद्धा काही दिवसांपूर्वी अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. मीरा-भाईंदरमध्ये अशाप्रकारे अवैध धंदे सुरु असल्याची सातत्याने चर्चा होती. पोलीस आयुक्त निकेत कौशिक नियुक्त झाल्याापासून त्यांनी या अवैध धंद्यांच्या विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. टारझन ऑर्केस्ट्रा बारमध्ये अशीच धडक कारवाई करण्यात आली.

पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून टारझन आर्केस्ट्रा बारमध्ये अवैध आणि अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी या बारवर छापा टाकला. यावेळी बारमध्ये ५ मुलींना थेट कपाटात लपवलेलं होतं. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं.
पोलिसांनी या कारवाईत तब्बल २१ जणांना अटक केली आहे. यामध्ये १२ मुलींची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी बारचा कानाकोपरा तपासला. यावेळी पोलिसांना एक दरवाजा दिसला. पोलिसांनी तपास केला असता तिथे एक बटन दाबलं की एक भुयाराचा दरवाजा उघडतो. खरंतर ते एक कपाट असल्याचं निष्पन्न झालं. या कपाटात ५ मुली होत्या. ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी सर्व मुलींची सुखरुप सुटका केली. या कपाटात श्वास घेणंही कठीण होतं, अशा कपाटात मुली लपलेल्या अवस्थेत सापडल्या.
पोलिसांनी स्वत: या कारवाईची माहिती दिली आहे. बारमध्ये बेकायदेशीररित्या मुलींना ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या बारवर छापा टाकला. यावेळी संबंधित बारमध्ये अनैतिक आणि बेकायदेशीर प्रकार सुरु असल्याचं निष्पन्न झालं.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here