निवृत्त पोलीस आयुक्ताचा सुनेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

crime
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । सुनेला मूल होत नसल्यामुळे सासऱ्यांनी (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) सुनेला अपत्य होण्यासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं. सुनेनं थेट पोलीस ठाणे गाठत सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. सहकार नगर परिसरातून ही घटना समोर आली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, तीस वर्षीय विवाहित महिलेचं ३५ वर्षीय तरूणासोबत लग्न झाले होते. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र, दोघांना अपत्य होत नव्हते. महिला गरोदर राहत नव्हती. तरूण मूल होण्यासाठी सक्षम नसल्याचे कुटुंबियांना माहिती होते. मात्र, तरीही पीडित महिलेचे त्या पुरूषासोबत लग्न लावून दिले. मात्र, यानंतर सासऱ्याची नियत फिरली. सासरा हा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त असल्याची माहिती आहे. लग्नानंतर सासरे सुनेच्या खोलीत गेले. नंतर सुनेला, ‘मुलाकडून तुला अपत्य होणं शक्य नाही. माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव’, असं त्यांनी सांगितलं.
या गोष्टीला सुनेनं नकार दिला. नंतर सासऱ्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली. पीडित महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांसमोर आपबिती सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह त्यांची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरोधात सहकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here