माजी मंत्री एकनाथराव खडसे जावई डॉ.प्रांजल खेवलकर यांना जामीन

प्रांजल खेवलकर

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी अटक होऊन कारागृहात असणारे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना आज (दि.२५) जामीन मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाथाभाऊंसह, ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी या भागात रेव्ह पार्टी करतांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रण आढळल्याचा देखील दावाही करण्यात आला होता. या प्रकरणावरून भाजपच्या नेत्यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर निशाणा साधला होता तर वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन नाथाभाऊ आणि त्यांच्या कन्या ॲड.रोहिणी यांनी स्पष्टीकरणही दिले होते.
डॉ.प्रांजल खेवलकर यांनी जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर आज दुपारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यामुळे आमदार खडसे, त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यासह खडसे व खेवलकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here