जळगाव (जिल्हा प्रतिनिधी विनोद पाटील) । भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, जळगाव व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्री बु. येथे गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन पद्धत प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शरद जाधव, इं. वैभव सूर्यवंशी व श्री. किशोर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शरद जाधव यांनी कापूस पिकाचे व्यवस्थापन, सुधारित शेती पद्धती व नवीन तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. इं. वैभव सूर्यवंशी यांनी पी बी नॉट (PB Knot) हे नवीन तंत्रज्ञान कसे कार्य करते तसेच कामगंध सापळ्यांचे गुलाबी बोंड अळी नियंत्रणात असलेले महत्त्व याची सविस्तर माहिती दिली. श्री. किशोर साळुंखे यांनी कापूस पिकातील विविध समस्या, त्यावरील उपाय व योग्य व्यवस्थापन तंत्र यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणात सुमारे ६० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कापूस पिकाच्या सुधारित व्यवस्थापन तंत्रज्ञानाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सचिन पाटील, भूषण वाघ, नितीन पाटील व मनोज बोरसे यांनी केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरून गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनास नवे परिमाण मिळाले.







