वडूजमधे सुमारे पन्नास जणांना अन्नातून विषबाधा

विषबाधा

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) । वडूज येथील वैभव ट्रेडर्स, अरिहंत ट्रेडर्स आणि साई बाझार यांनी स्थानिक पातळीवर तयार केलेले वरवीचे पीठ खाल्ल्यामुळे वडूज व मांडवे येथील काही महिलासह पुरुषांना हात पाय थरथर कापणे, चक्कर येणे आणि अशक्तपणा अशा पद्धतीचा त्रास झाल्यामुळे वडूज येथील खाजगी रुग्णालयात हे रुग्ण दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार वडूज पोलीस ठाण्याने दप्तरी नोंद घेऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली असल्याची माहिती पो.नि. घनश्याम सोनवणे यांनी दिली .

सध्या नवरात्र उत्सव असल्यामुळे अनेक जणांचे उपवास असतात या कारणाने उपवासाला चालणारे खाद्यपदार्थ फळे व फळांच्या रसाचे सेवन केली जाते यामध्ये भगर, वरवीचे तांदूळ, वेफर्स, बर्फी व फळे आदींचा समावेश असतो परंतु वर्रवीच्यातांदळाच्या पिठाची भाकरी सेवन करण्याचे प्रमाण सध्या जास्त आहे त्यामुळे या पिठाला ज्यादा मागणी असते वडूज शहरातील काही नामांकित दुकानात वैभव ट्रेडर्स, अरिहंत ट्रेडर्स व साई बाजार या दुकानातून वरवीचे पीठ रुग्णांनी खरेदी करून नेल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते बुधवार दिनांक २४ रोजी रात्री उशिरा मांडवे गावातील सुनिता जयवंत पाटील, अलका मारुती फडतरे, सीमा सयाजी यादव (रा. मांडवे ) सुभद्रा सुगंधा गुरव रा. किरकसाल ता. माण, सुवर्ण प्रकाश पवार व शांता शरद पवार रा. उंबर्डे तर वडूज येथील केदार किशोर तोडकर व इतर जनांचे रक्ताचे व उलटी चे नमुने बाटलीत सील करून तपासणीसाठी पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली
वडूज येथील निखिल सुधीर गांधी व इतर दोघांना पोलिसांनी समजपत्र देऊन उर्वरित उपवासाची भगर ही कोणत्याही ग्राहकास विक्री करू नये अशी लेखी समज दिली आहे तर वडूज पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सातारा कार्यालय यांना चौकशीसाठी पुढील कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here