सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे, सातारा हादरवणारा सराईत गुंड गावठी पिस्टलसह जेरबंद

सराईत गुंड

सातारा (उपसंपादक अरुण मोरे) : पुणे जिल्ह्यातील सदोष मनुष्यवध, मोक्का आणि हाफ मर्डरसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असणारा सराईत आणि कुख्यात गुंड सातारा शहरात गावठी पिस्टलविक्रीसाठी येणार असल्याची गोपनिय माहिती सातारा शहर डी.बी. पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या कुंडाला शिताफीने जेरबंद केले असून, त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

आदेश पांडुरंग बिरामणे (वय ३०, रा. धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर पुणे जिल्ह्यात सदोष मनुष्यवध, मारामारी, हाफ मर्डर, मोक्का यांसारखे ७ हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सातारा शहर परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांनी दिले होते. या सूचनेनुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक गस्तीवर होते.
सराईत गुंड आदेश बिरामणे हा संगममाहुली ब्रिजजवळ अवैध पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची पक्की माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना मिळाली. त्यानुसार शहर डी.बी. पथकाने पंचांसमवेत संगममाहुली ब्रिज परिसरात सापळा रचला. रात्रीच्या वेळी संशयित आरोपी संगममाहुली जाणाऱ्या रोडवरून जात असताना पोलिसांची चाहूल लागताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी तात्काळ हालचाल करत त्यास चौफेर घेरले आणि ताब्यात घेतले.
झडती दरम्यान आरोपीच्या कमरेला विनापरवाना एक गावठी पिस्टल आणि ३ जिवंत राऊंड (काडतुसे) मिळून आले. परवाना नसताना अवैधरित्या घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पोलीस अंमलदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, वैभव माने, संतोष घाडगे आणि सचिन रिटे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here