कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) : शहरात दुचाकी चोरीचे सत्र वाढवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ६ स्प्लेंडर मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.शिवाजी मधुकर चव्हाण (वय ५५ वर्षे, रा. रेसकोर्स नाका, ताराराणी कॉलनी, आदर्श वसाहत, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.
कोल्हापूर शहर परिसरात स्प्लेंडर मोटारसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, पोलीस अधीक्षक श्री. नीलओत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. आप्पासाहेब जावळे यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालीत होते.
९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:३६ वाजताच्या सुमारास, भाजी मंडईजवळ संशयास्पद हालचाली करताना आढळलेल्या शिवाजी चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने गेल्या एक महिन्यात कोल्हापूर शहरातील सायबर चौक, बिंदू चौक, जैन मंदिर आणि रेसकोर्स नाका या भागातून या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. न्यायालयाने त्यास १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
आरोपीकडून एकूण १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या खालील ६ स्प्लेंडर मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत: १. ₹४०,००० किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक: MH-09-DW-२८९३) २. ₹१५,००० किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक: MH-01-BT-२६५७) ३. ₹३०,००० किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्रमांक: MH-09-ET-१९०४) ४. ₹४०,००० किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक: MH-09-FE-९२३७) ५. ₹२५,००० किमतीची हिरो स्प्लेंडर प्रो मोटारसायकल (क्रमांक: MH-09-DE-३४२२) ६. ₹४५,००० किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक: MH-09-FK-१४२१)
सदर धडक कारवाई करवीर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो.हे.कॉ. अमर पाटील, प्रशांत घोलप, प्रविण सावंत, मोहन लगारे, स्वप्निल कांबळे आणि प्रितम सुर्यवंशी यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रविण सावंत करत आहेत.
Home पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर: जुना राजवाडा पोलिसांची मोठी कारवाई; ६ मोटारसायकलींसह सराईत दुचाकी चोरटा जेरबंद







