जळगाव (संपादक सुनिल पाटील) । राजस्थानातील भरतपूर येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेमध्ये जळगावची सुकन्या कु.दिशा विजय पाटील हिने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
दिशा विजय पाटील या जळगावमधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित नूतन मराठा महाविद्यालयाची विद्यार्थिंनी असून, त्यांनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांचे नाव भारतभर चमकवल्याबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ. एल. पी .देशमुख सर्व उपप्राचार्य प्राध्यापक रुंद व क्रीडा संचालक यांनी अभिनंदन केले आहे.







