मेहरूण स्मशानभूमीतील सुविधांसाठी अनोखं आंदोलन; आ.राजूमामा भोळे यांनी तत्काळ घेतली दखल

मेहरूण

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । मेहरूण स्मशानभूमीत आवश्यक सुविधांची मागणी करत नागरिकांनी चक्क जिवंतपणे सरणावर बसून अनोखं आंदोलन छेडलं. स्मशानभूमीच्या परिसरातील पायाभूत सुविधा, पाणी, प्रकाशयोजना आणि स्वच्छतेच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी हा आगळावेगळा मार्ग अवलंबला.

या आंदोलनाची माहिती मिळताच शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सुविधांसंदर्भात चौकशी केली तसेच आवश्यक ते निर्णय त्वरित घेण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या भावनांना मान देत, समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, स्मशानभूमीतल्या समस्यांकडे अनेकदा लक्ष वेधूनही योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच शेवटचा उपाय म्हणून हे अनोखं आंदोलन करावं लागलं. आमदारांनी दखल घेतल्याने नागरिकांत समाधानाची भावना व्यक्त होत आहे. सदर प्रकरणामुळे मेहरूण परिसरातील स्मशानभूमीच्या सुविधांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत सुधारणा कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here