पवननगर सिडको परिसरात संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती उत्साहात

जगनाडे महाराज

नाशिक (संपादक सुनिल पाटील) । राष्ट्रसंत संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती आज पवननगर सिडको येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष अर्जुन वेताळ यांनी प्रस्तावना केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संदीप कोते हे होते. विनायक सोनवणे सरांनी श्री संत जगनाडे महाराज यांनी केलेल्या कार्याविषयी समाज बांधवांना संबोधित केले. मंडळाचे सचिव वसंत चौधरी यांनी नवीन नाशिक मधील तेली समाजाची जास्तीत जास्त सभासद व्हावे म्हणून समाज बांधवांना आवाहन केले. संताजी महाराजांच्या प्रतिमेला प्रतिमेस पुष्पहार श्री हिरेन चौधरी यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.

सर्व समाज बांधवांनी प्रतिमा पूजन केले. श्री राजेंद्र लोखंडे सरांनी आपले मनोगतातुन समाजामध्ये एकोपा व संघटन बाबत मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष श्री रविंद्र चौधरी यांनी केले.
कार्यक्रमासाठी नवीन नाशिक मधील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्रामुख्याने माजी अध्यक्ष शिवाजी चौधरी , संतोष चौधरी सर , नितीन पवार सर, रघुनाथ चौधरी, राहुल गणोरे, पत्रकार किशोर चौधरी सर, सुदाकर दुरगुडे , राम बोरसे ,जे.टी. चौधरी सर, रमेश चौधरी, सुधीर चौधरी, अभिजीत बारगजे, पुरुषोत्तम करंकाळ, मोहीत पन्हाळे, महेंद्र चौधरी, दिलीप चौधरी, हिरामण चौधरी, अरुण राऊत, किरण वेताळ, रामदास चौधरी, सुनिल ठाकरे,राजेंद्र चौधरी, सचिन चौधरी,ईश्वर चौधरी , सर्वांगिणी महिला मंडळ अध्यक्षा, वर्षा वेताळ,उपाध्यक्ष सुनीता बोरसे, निशा चौधरी, संगीता कोते, सविता किर्वे, मोनाली चौधरी, सुवर्णा कोते, शोभा चौधरी, रत्ना चौधरी, नम्रता चौधरी, सरला चौधरी, उषा चौधरी, कौशल्या चौधरी, प्रमिला चौधरी, संगिता महाले, आदी सह समाज बांधव व भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here