मंगळवेढा पोलीस स्टेशनची सोलापूर पोलीस अधीक्षकांकडून वार्षिक तपासणी

मंगळवेढा पोलीस

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आज रोजी दिनांक 10/12/2025 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे वार्षिक तपासणीचे अनुषंगाने पोलीस स्टेशनला भेट दिली. भेटीदरम्यान महोदय यांना पो. नि. बोरिगिड्डे यांनी, सर्व अधिकारी अंमलदार यांचेसह मानवंदना दिली.

त्यानंतर महोदय यांनी पोलीस स्टेशन व परिसराची पाहणी करून, पोलीस स्टेशन मधील स्वच्छता नीटनेटकेपणा, पोलीस स्टेशन मधील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मुद्देमालाची निर्गती याबाबत समाधान व्यक्त केले. मंगळवेढा पोलीस स्टेशनला येणारे तक्रारदार यांना लवकरात लवकर न्याय मिळावा याकरता, शासनाने नव्याने अंमलात आलेल्या कायद्यानुसार, पोलीस स्टेशन मधील दाखल होणाऱ्या गुन्ह्याची 30/60/90 दिवसात तपास पूर्ण करून गुन्हे तपास पूर्ण करण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून यापेक्षा चांगले काम करण्याबाबत मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी केले.
पोलीस स्टेशन कडील सर्व अभिलेखाची पाहणी केली व सूचना दिल्या. पोलीस स्टेशन कडील ज्या अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्हे तपासाबाबत उत्कृष्ट काम केले आहे त्यांचे अभिनंदन करून यापुढे देखील असेच काम करण्याबाबत शुभेच्छा दिल्या. सर्व बीट अंमलदार यांना सर्व गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करून गुन्हे नियंत्रण करण्याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्याला बोलावून त्यांचे गुन्हेगारी प्रवृत्ती पासून मनपरिवर्तन करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांची वृंदपरिषद घेऊन त्यामध्ये त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे लागलीच निराकरण केले.
पोलीस ठाणे पत्रकार बंधूंची बैठक घेऊन, सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या LawEnforce 24 या app च्या वापरामुळे गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, CCTV बसवण्यात आलेली ठिकाणे, वारंवार अपघात होणारे ठिकाणे, चोरी, घरफोडी, दरोडा ई. घडलेल्या ठिकाणांचे क्राईम मॅपिंग करून त्यावर नियंत्रण ठेवून जनतेच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here