केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतले कुलस्वामी श्री जोतिबा देवांचे दर्शन

श्री जोतिबा

पन्हाळा (तालुका क्राइम रिपोर्टर अनिल सांगळे) । केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे त्यांचे कुलदैवत श्री ज्योतिबा देवांचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे आले. सायंकाळी ६ वाजता त्यांचे मंदिर परिसरात आगमन झाले.

त्यानंतर त्यांनी त्यांचे वंशपरंपरागत मिटके पुजारी यांच्यासोबत विधिपूर्वक श्री नंदी मंदिर,श्री महादेव मंदिर ,श्री चोपडाई मंदिरात दर्शन घेतले व श्री जोतिबा मंदिरात पोहचले त्यानंतर त्यांनी देवाधिदेव श्री जोतिबा देवांच्या चरणी गुलाल,पुष्पहार,नेवैद्य अर्पण करून श्रींचे दर्शन घेतले तसेच त्यांनी श्री काळभैरव मंदिरांसह मंदिर परिसरातील इतर देवी देवतांचे दर्शन घेतल्यानंतर , श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना पुष्पहार अर्पण केला,यावेळी श्री शाहू वैदिक विद्यालय शाखा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर यांच्यावतीने पुरोहित श्री विश्वास झुगर गुरूदेव,व श्री उमेश शिंगे यांच्यावतीने श्री जोतिबा मंदिरात वंशपरंपरागत पूर्वापार चालत आलेल्या काही सेवा ह्या बंद असून त्या सेवा खंड न पडता पुर्वापारप्रमाणे श्री जोतिबा देवांच्या सेवेत पूर्ववत सुरू व्हाव्यात अश्या मागणीचे निवेदन मा केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिले.
श्री जोतिबा मंदिर दर्शनावेळी श्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सोबत श्री शिवराज नायकवडी,सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर , श्री धैर्यशील तीवले ऑफिस इंचार्जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जोतिबा डोंगर, श्री अजित झुगर,इंचार्ज सिंधिया देवस्थान ट्रस्ट संस्थान वाडीरत्नागिरी,श्री समीर शिंगटे, उपविभागीय दंडाधिकारी पन्हाळा,इतर मान्यवरांसह पुजारी,ग्रामस्थ व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here