ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । अंमली पदार्थ विरोधी पथक ०१, गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी/अंमलदार दिनांक ०४/१०/२०२५ रोजी गस्त करीत असताना संशयावरुन ६ इसमांची झडती घेतली असता त्यांचे कब्जात रुपये १,००,३२,०००/- किंमतीचा ५०१.६ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्स, रुपये १,८६,०००/- किंचे ८ मोबाईल व रुपये ४,१०,०००/- किंच्या ४ मोटार सायकल मिळून आले. त्याबाबत काशिगाव पोलीस ठाणे गुरक्र ४४५/२०२५ एनडीपीएस कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ मार्फत करण्यात येत आहे.
तपासा दरम्यान अटक आरोपींच्या ताब्यात मिळुन आलेला एमडी ड्रग्स बाबत तपास करुन पुढे ४ आरोपींना अटक करण्यात आले. त्यांचेकडुन गुन्हा करणेसाठी वापर केलेले रुपये २०,००,०००/- किं.च्या २ चार चाकी व १ मोटार सायकल तसेच गुन्हयात वापरलेले रुपये २,०५,०००/- किंचे ६ मोबाईल जप्त करण्यात आले.
पुढील तपासादरम्यान पाहीजे आरोपीचा शोध घेताना प्राप्त माहितीचे आधारे पोलीस पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. राजस्थान येथे केलेल्या तपासामध्ये दिनांक १४/१२/२०२५ रोजी पोलीस पथकास झुनझुनु, राजस्थान येथे आरोपी अनिल विजयपाल सिहाग व एमडी ड्रग्स बनविण्याची फॅक्ट्री मिळुन आली आहे. सदर एमडी फॅक्ट्री मध्ये सुमारे १० किलो एमडी ड्रग्स, एमडी चे प्री-कर्सर रसायने तसेच एमडी ड्रग्स बनविण्याची आवश्यक ती साधनसामुग्री (फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, वजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ) असा एकुण रुपये १०० कोटी किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
सदरची कारवाई मा.श्री निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा.श्री दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा.श्री संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे प्रकटीकरण) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष ०१ चे प्रभारी पोनि/समीर शेख, पोउनि / निखील चव्हाण, सपोउपनि/पवन पाटील व प्रदिप टक्के, पोहवा/सचिन घेरे, विनोद आवळे व महेश वेल्हे, पोअं/प्रतिक गोडगे सर्व नेमणुक अंमली पदार्थ विराधी पथक ०१ तसेच पोउनि/अनिल पवार, पोहवा/संग्राम गायवाड व सुधीर नरळे, पोअं/राजकुमार गायकवाड व अजित मेड सर्व नेमणुक अंमली पदार्थ विरोधी कक्ष ०२ तसेच सपोउपनि/संतोष चव्हाण, नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.







