सुप्रिम कॉलनी येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; ०२ आरोपींना अटक

घरफोडी

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर तेजस भंगाळे) । दि.१३/१२/२०२५ रोजी फिर्यादी शरीफ मुराद खाटिक, रा. सुप्रिम कॉलनी जळगांव हे चाळीसगांव येथे लग्न समारंभाकरीला गेले असता त्यांचे राहते घराचे कडी कॉंडा तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ४९६००/- रु चा मुद्देमाल चोरुन नेल्या बाबत तक्रार दिल्याने एमआयडीसी पो.स्टे येथे अज्ञात इसमाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची घरफोडी ही अभिलेखावरील गुन्हेगार १) शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर रा. कासमवाडी जळगांव २) साहिल शहा सद्दाम शहा ऊर्फ काल्या रा. तांबापुरा जळगांव यांनी केली असल्याबाबतची माहिती मा. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना मिळाली होती. त्याप्रमाणे कासमावडी परिसरातुन नमुद आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. म्हणून नमुद आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी एमआयडीसी पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. चे पोहेकों/किरण चौधरी हे करीत आहेत. नमुद दोन्ही आरोपी मजकुर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, मा. श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि, शरद बागल, सफी/अतुल वंजारी, पोहेकों/अक्रम शेख, विजय पाटील, पोना/किशोर पाटील, पोकों/राहुल रगडे, रविंद्र कापडण, गोपाल पाटील सर्व स्थागुशा जळगांव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here