अमरावती (प्रतिनिधी) । शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप वाढत असल्याचे, पोलीस आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत खून व खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्यांत वाइ इशली आहे. दरोडे, घरफोडी आणि वाहन चोरीसारख्या मालमतेशी संबंधित गुन्ह्यांमध्ये घट नोंदवली गेली आहे
०२५ च्या १ जानेवारी ते ३ डिसेंबर या कालावधीत अमरावती पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ३७ राखुनांच्या घाटना चंडल्या आहेत. २०२४ च्या तुलनेत वाक्यों खुनांच्या संख्येत वाढ झाली आहे. या कालावधीत विविध गुन्ह्यांप्रकरणी ३२२० आरोपींना अटक करण्यात आली आहे. वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खुनाचा अपवाद वगळता उर्वरित ३६ खुनांच्या गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, चलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा येथील खुनाचे गूढ अद्याप उकललेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस सातत्याने करीत आहेत. गुन्हेगारीच्या आकडेवारीनुसार, खून व खुनाचा प्रयान या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असली तरी दरोड्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०२४ मध्ये १४ दरोड्यांची नोंद होती, तर २०२५ मध्ये ही संख्या पटून ९ वा आली आहे. खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांतही किंचित वाह नोंदविण्यात आली आहे. २०२४ मध्ये ५२, तर २०२५ मध्ये ५३ गुन्हे दाखल झाले आहेत.
इतर गुन्ह्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, बलात्कार, अपहरण तसेच अपघातांच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट दिसून येते. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंमली पदार्थाचे व्यसन आणि वैयक्तिक वाद ही हत्या व हल्ल्यांची प्रमुख कारणे असल्याचे पोलिस सूत्रांचे मत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील संवेदनशील भागांत पाळत वाढविणात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे, विशेष पथके आणि गस्तीद्वारे गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली.







