शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) । नांदेड येथे हिंदू प्रवक्त्या हर्षा ठाकुर यांचेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन शिरपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्हयातील हिंदू प्रवक्त्या व सामाजिक कायकर्त्या म्हणुन कार्यरत असलेल्या कु. हर्षदा ठाकुर हया गेल्या काही वर्षापासुन हिंदू समाजातील युवक व युवती मध्ये जनजागृतीचे कार्य करीत असुन विशेषतः काही युवकाकडुन हिंदू मुलींना फुस लावुन प्रेमाच्या जाळयात अडकवित असुन त्यांचे फोटो काढुन, व्हीडीओ क्लीप तयार करुन, आर्थिक व मानसिक तसेच शारीरिक शोषण करणे तसेच धर्मांतरण करणेसाठी वेगवेगळ्या पध्दतीने दबाव टाकुन लव जिहाद प्रकारा विरोधात त्या सातत्त्याने, कसोटीने आवाज उठवत आहेत.
माध्यमातील बातम्या, व तक्रारी नुसार या सामाजिक कार्यामुळेच कु.हर्षदा ठाकुर यांना मागिल दोन तीन वर्षापासुन जिवे मारणेची धमकी देण्यात येत आहे, व तसे त्यांचेवर वेळोवेळी प्राण घातक हल्ले देखील झाले आहेत तरी सुध्दा अद्याप समाज कटंका विरुध्द कोणतीही प्रभावी व ठोस कारवाई करण्यात आलेली दिसुन येत नाही ही अत्यंत गंभीर व खेदजनक बाब आहे.
तसेच सलमान शेख नावाचे व्यक्तीकडुन फोनद्वारे मानसिक व शारीरिक जिवे मारणेची धमकी दिल्याने भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच याच बरोबर लव जिहादाच्या प्रकारामुळे सहभागी असलेले काही युवक हिंदू मुलींना फसवुन त्यांचे आयुष्य उध्दवस्त केले जात आहे अशा घटना सतत होत आहेत अशा समाज कंटक युवकावर गंभीर व कठोर कारवाई होणे आवश्यक व गरजेचे आहे. तरी कु. हर्षदा ठाकुर यांचे समाज कार्यामुळे त्यांचेवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवित आहे तरी त्यांचेवर होत असलेल्या हल्लेखोरावर शासनाने कठोर मधील कठोर कारवाई करुन त्यांचा नायनाट करुन हिंदू समाजाला न्याय मिळावा, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.







