जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधीक्षक जळगाव भाग जळगाव यांचे कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय, जिल्हा विशेष शाखा अशा विविध शाखा असून सर्व शाखा या संगणीकृत करण्यात आलेले आहेत. तसेच सदरच्या शाखेमध्ये जवळपास महिन्याकाठी अंदाजे 10000 ते 11000 युनिट्स वीज खर्च होत असते. आता नव्याने पोलीस अधीक्षक कार्यालयातील छतावर 4000 ते 5000 स्क्वेअर फूट जागेमध्ये 184 सोलर प्लेट बसवलेल्या असून, सोलर प्लांट मुळे दिवसाला कमीत कमी 300 युनिट्स वीज व उन्हाळ्यात 400 ते 450 युनिट तयार होणार आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील वीज बिल खर्च कमी होणार असून, अधिकची वीज तयार होणार आहे.
सदर उद्घाटन प्रसंगी मा.श्री.रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव, मा. डॉ.श्री. महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलिस अधीक्षक जळगाव, मा.श्री. आव्हाड.पोलीस उप अधीक्षक(गृह) मा. श्री.नितीन गणापुरे उपविभागीय पोलिस अधिकारी जळगाव भाग जळगाव, श्री सतीश गोराडे पोलीस निरीक्षक जि.वि.शा.जळगाव,श्री राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव श्री प्रशांत सुगरवार, राखीव पोलिस निरीक्षक जळगाव हे उपस्थित होते.







