ठाणे पोलिसांनी शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील खूनाचा गुन्हा आणला उघडकीस

शहापूर पोलीस

ठाणे (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर नामदेव पाटील) । दिनांक ०७ / १२ / २०२५ रोजी १२.३० वा. चे पुर्वी मौजे कळमगांव ता. शहापुर येथील खरमेपाडा येथे एका शेता जवळ पाण्याचे ओढयात कोणीतरी अज्ञाताने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन एका इसमाचा मृतदेह डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने गंभीर स्वरुपाच्या दुखापती करुन जिवे ठार मारुन पुरावा नष्ठ करण्याचे उद्देशाने मृतदेह पाण्याचे ओढयात फेकुन दिला होता, सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी दरम्याण सदरचा मृतदेह बालु नामा विर, वय ४२ वर्षे राहाणार कोथळा, पोस्ट वाशाळा, ता. शहापुर जि. ठाणे याचा असल्याचे उघड झाले, त्यानंतर शहापुर पो. ठाण्याचे पोउप-निरीक्षक, महादेव तुळशीराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरुन शहापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक ४१२ / २०२५ भा. न्या. सं कलम १०३ (१) २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता मा. श्री डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच मा. श्री अनमोल मित्तल, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देवुन नमुद स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेकामी आदेशीत करुन मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे श्री संदीप गिते, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण व श्री मुकेश ढगे, पोलीस निरीक्षक, शहापुर पोलीस ठाणे यांनी गुन्हया उघडकीस आणण्याकरीता वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले.
नमुद पथकांनी अहोरात्र अथक परीश्रम घेवुन घटनास्थळा जवळील राहणारे लोकांकडे तसेच मयताचे नातलगांकडे कौशल्यपूर्ण विचारपुस केली असता, सदरचा गुन्हा विठ्ठल रतन पारधी वय ३६ वर्षे रा. खरमेपाडा, कळमगांव, ता. शहापुर जि. ठाणे याने केल्याचे निष्पन्न झाले. विठ्ठल रतन पारधी वाचेकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता, मयत याने आरोपीचे दुकानातुन किराणा साहीत्य उधार दिले नाही म्हणून आरोपी व त्याची पत्नीस शिवीगाळी केल्याने त्याचा आरोपीतास राग येवुन त्याने मयतास डोक्यात फटका मारल्याने तो खाली पडुन गंभीर दुखापत झाली आरोपीत याने मयत यास खांदयावर घेवुन घटनास्थळाजवळील पाण्याचे ओढयाजवळ टाकुन त्याचेवर मोठ-मोठी दगडी ठेवुन आरोपीत विठ्ठल रतन पारधी याने जिवे ठार मारल्याची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई मा. श्री डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, तसेच मा. श्री अनमोल मित्तल, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संदीप गिते यांचे नेतृत्वात पोलीस उप-निरीक्षक महेश कदम, दिपेश किणी, भाऊसाहेब गायकवाड तसेच सफी / प्रकाश साईल पोहवा / संतोष सुर्वे, पोहवा / गोवींद कोळी, पोहवा / सतीष कोळी, पोशि/ स्वप्नील बोडके, पोहवा / वनीता पालांडे, मपोशि/ अश्वीनी कोकरे, मपोशि/ कमल मोरे, शिला सालवे, वैशाली पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण तसेच शहापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मुकेश ढगे, पोलीस उपनिरीक्षक, अलोक खिसमतराव पोहवा / शशिकांत पाटील, मंजुर शेख, पांना / विकास सानप, पोशि/ रमेश नालावडे, मोहन भोईर यांनी उघडकीस आणलेला असुन गुन्हयाचा अधिक तपास शहापुर पोलीस ठाणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here