आदर्श गाव उंबरखेडमधील वाचनालयाला १०० पुस्तके भेट..

उंबरखेड

नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । निफाड तालुक्यातील उंबरखेड हे गाव सध्या आदर्श गाव म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. या गावातील नवे नेतृत्व.. जुन्या लोकांचे मार्गदर्शन घेऊन अतिशय चांगलं काम करत आहे. त्यांनी सुरू केलेलं वाचनालय , ऑक्सीजन गार्डन, आजोबांचे स्वतंत्र गार्डन , स्मशानभूमीला दिलेलं सुंदर रूप, गावाच्या सुरुवातीला असणारा सेल्फी पॉइंट.. गावभर सुंदर लावलेली झाड.. , अत्यंत आधुनिक होणारी जिल्हा परिषदेची शाळा.. सुरू असणारे सुंदर मंदिर.. अतिशय देखणं व मोठे सभागृह हे सगळे या गावात बघण्यासारख आहे.. या आदर्श गावाला बघितल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटतात.. राजकारणात आल्यानंतर कसं काम करावं..?? हे बघायचं असेल तर उंबरखेड गाव बघा..!!

अशा या सुंदर गावातील सावित्रीबाई फुले वाचनालय व अभ्यासिकेला इंजिनिअर कुबेर जाधव यांनी १०० पुस्तके भेट दिले. यावेळेस माझ्यासोबत माझे चुलते जयराम जगताप, माझे मित्र उंबरखेड सोसायटीचे सहाय्यक सचिव अविनाश संधान, नारायण संधान सोबत होते. तसेच उंबरखेड ग्रामस्थांच्या वतीने आमचे दाजी जयराम शिंदे, रोटरी क्लब अप टाऊन डोंबिवली चे अध्यक्ष अजित दादा कागदे साहेब , उंबरखेड ग्रामपंचायत सन्मानिय सदस्य रमेश निरगुडे, सुभाष निरगुडे , दत्तु पानसरे, डॉ.प्रविण पाटील हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here