शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये काय? शेतकरी पुत्र महेंद्र पांढरकर यांचा शासनाला प्रश्न

शेतकऱ्यांनी

पारनेर (तालुका प्रतिनिधी सुनील लोणकर) । शेतकऱ्यांनी शेती माल , भाव वाढ वा शेती च्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन केले , वा नुसता विचार केला , तरी प्रशासनाकडून त्या शेतकऱ्याला पोलीस प्रशासनाकडून पोलीस कारवाई ची भिती दाखवली जाते , हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून शेतकऱ्यांनी आंदोलन करूच नये का ? असा उदिग्न सवाल शेतकरी पुत्र महेंद्र पांढरकर यांनी केला आहे .

शेतकरी पुत्र महेंद्र पांढरकर पुढे म्हणाले की ,यापुढे शेतकरी पुत्रांनी स्वतः च्या न्याय हक्कासाठी रस्ता वर उतरायचे नाही का ? डोळ्यासमोर मोठ्या कष्टाने, भांडवल घालून पिकवलेला माल समोर मातीमोल किंमतीत विकताना बघ्याची भूमिका घ्यायची का ? दरवर्षी शेतीमाल उत्पादन करणेसाठी लाखो रुपये भांडवल घालताना सहकारी बँक,खाजगी बँका , सावकार यांच्या कडुन कर्ज काढायचे आणि शेती मालाला भाव नसल्याने कर्जबाजारी होयचे का ? असेच या पाठीमागे आमचे पंजोबा, आजोबा , वडील पिढ्यान -पिढ्या फक्त कष्ट करून शेती करायचे , त्यांनी शेवटपर्यंत कर्जाच्या विळख्यात राहुन , शेवटी नैराश्यातुन आत्महत्या करायची का ? या व इतर प्रश्नांवरुन गुन्हा दाखल करताना पोलिस प्रशासन हे शेतकऱ्यांना या पुढे कुठलेही आंदोलन,रास्ता रोको करताना माणसे, शेतकरी जमवायचे नाही, म्हणून कागदे घोडे नाचवत पोलीस कारवाई करून धमकावले जाते व शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो , मग शेतकऱ्यांनी आवाज उठवायचा नाही का ? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करायचे नाही , पोलीस प्रशासन असे लिहुन घेणार म्हणजे आपण शेतकरी पुत्रांनी कितीही कृषी संकटं आले तरी गप्प बसुन सर्व सहन करत राहायचे का ? बोलायच पण नाही का ?
महाराष्ट्राचे जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाच्या देठाला,काडीला कुठलेही हानी पोहचली नाही पाहिजे, कष्टकरी, शेतकरी राजा जगला, टिकला पाहिजे , ही भुमिका घेतली , कष्टकरी टिकला , तर च सर्व जग टिकेल ही भुमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती परंतु अलिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सध्या राज्यात आणि केंद्रात चालणारा राज्यकर्ते आणि शासनकर्ते यांचा विरोधी भास,अजब कारभार बघुन अवघड वाटत आहे , अशी खंत ही शेतकरी पुत्र महेंद्र पांढरकर यांनी व्यक्त केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here