देवाच्या सेवेत झिजलेले व्यक्तिमत्त्व; देवाचे सेवक पास्टर सुनील सूर्यवंशी स्मृतिदिन

पास्टर सुनील सूर्यवंशी

पारनेर (तालुका प्रतिनिधी सुनील धोंडीभाऊ लोणकर) । तालुक्यातील हंगा येथील संत पौल चर्च येथे रविवारी झालेल्या भक्ती सभेत येशू ख्रिस्ताचे निष्ठावंत सेवक व ख्रिस्ती समाजातील निस्वार्थ सेवेसाठी ओळखले जाणारे संत पौल चर्च चे धर्मगुरु पास्टर सुनिल सूर्यवंशी यांच्या दिनांक 22डिसेंबर स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सेवाकार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी भाविक, नातेवाईक व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“येशू ख्रिस्ताचे सेवक पास्टर सुनिल सूर्यवंशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देवकार्य व समाजसेवेसाठी अर्पण केले. त्यांचा निःस्वार्थ सेवाभाव, प्रेम व करुणा ही पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांनी उभा केलेला सेवाभावी आदर्श कायम स्मरणात राहील,”असे प्रतिपादन संत पौल चर्चचे सर्वमंडळी यांनी केले.

सध्या चर्चचे पास्टर जेसन वाझ यांनी आपल्या मनोगतातून पास्टर सुनिल सूर्यवंशी यांच्या सेवाभावी जीवनकार्याचा आढावा घेतला. देवाच्या कार्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे सूर्यवंशी हे प्रेम, करुणा, मनमिळावूपणा व सेवाभावाचे प्रतीक होते. त्यांनी देवाच्या सेवेत कार्य करताना स्वतःसाठी काहीही न मागता समाजासाठी सातत्याने कार्य केले.
आज ते प्रत्यक्ष आमच्यात नसले तरी येशू ख्रिस्तासाठी त्यांनी केलेले कार्य, त्याग व परिश्रम कायम स्मरणात राहतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी कुटुंबीय, विश्वासू बांधव व समाजातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांची शिकवण व सेवाभाव पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here