पारनेर (तालुका प्रतिनिधी सुनील धोंडीभाऊ लोणकर) । राज्यात जागृत व नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निघोज येथील श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कार्याध्यक्ष वसंतराव कवाद यांच्या अध्यक्षतेखाली कुंड पर्यटन स्थळावरील ट्रस्टच्या सभागृहा मध्ये खेळीमेळीत संपन्न झाली.
४२ वर्षापूर्वी दिवंगत अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या निघोज येथील श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची स्थापना करण्यात आली . या श्री मळगंगा देवीच्या दर्शनासाठी देश व राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने वर्षेभर येतात . या सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलतान वसंतराव कवाद म्हणाले की , श्री मळगंगा ट्रस्टला मिळालेल्या मोठ्या देणगी च्या माध्यमातून निघोज गावात विविध विकास कामे केली जातात . तर सोशल मीडिया च्या माध्यमातून श्री कुंड पर्यटन स्थळी असलेल्या कुंड पर्यटन स्थळांची मोठ्या प्रमाणावर रिल्स प्रसिद्ध होतात . त्यामुळे हे जागतिक दर्जाचे ११ वे आश्चर्य असून येथे दररोज पर्यटक येत असतात . त्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून जेवढी जास्त प्रसिद्धी करता येईल , तेवढी केली जाते . अन्न प्रसादालय सुरू केल्याने अनेकांची जेवणाची सोय उपलब्ध केली आहे . ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही , त्यांना मोफत जेवण दिले जाते . या प्रसादालयाला लागणारा महिना भरासाठी जवळपास एक लाख रुपयांचा किराणा , तो गावातील किराणा दुकान दारांकडून घेऊन त्यांना व्यवसाय देण्याचे काम केले जाते . स्पर्धा परीक्षेत निघोज व परिसरातील हुशार विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षे चा अभ्यास करून यशस्वी प्रशासकीय अधिकारी होण्या करिता स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका सुरू केली , त्यात आज ६२ विद्यार्थी लाभ घेतात . बाहेरील पर्यटकांना राहण्यासाठी २ अद्यावत खोल्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे . भक्त निवासा साठी संरक्षक भिंत , कुंड पर्यटन स्थळासाठी रात्री ची मोठ्या प्रमाणावर वीजेच्या प्रकाशाची गरज आहे . तो प्रस्ताव ही दिला आहे . स्मशान भूमी सुशोभिकरणाचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे दिला आहे . गावाचे सांड पाणी हे गावच्या ओढ्यात सोडले जाते , त्यामुळे विहिरींचे पाणी दुषित होते , त्याच्या साठी २७ लाखांचा प्रस्ताव दिला आहे . त्यातून ते दुषित पाण्यावर प्रक्रिया करून झाडांना वापरता येणार आहे . गावातील कचऱ्याची मोठी समस्या असून ती सोडवणे गरजेचे आहे . मोठ्या समारंभा त होणाऱ्या अन्नदानाच्या वेळी देण्यात येणारी पत्रावळी मुळे मोठा कचरा निर्माण होतो , तो टाळण्यासाठी ५०० स्टिलची ताटे लोक देणगी तून देणगीदारांनी ट्रस्टला दिली आहे . अनेकांनी याचा लाभ ही घेतला . त्यातून आरोग्याची समस्या निर्माण होणार नाही .गावचा विकास होण्यासाठी बाहेरील पर्यटक कसे गावात येतील , त्यातून चार पैसे गावात येईल . त्यातून विकास साधण्यात येईल . या ट्रस्टच्या माध्यमातून गावा चा विकास साधण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिल. सचिव शांताराम कळसकर यांनी ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील सर्वच विषयांचे वाचन करत सुत्रसंचालन करत आभार ही मानले .
मनोगतात माजी कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांनी विविध अभ्यास पूर्ण मुद्दे मांडले , तर मच्छिंद्र लाळगे , उद्योजक मुकुंद निघोजकर , दिलीप ढवण , शरद ठुबे , दत्ता लंके , चेअरमन सुनिल वराळ , रूपेश ढवण ,अर्जुन लामखडे व इतरांनी विविध प्रश्न मांडले. या सभेला उपकार्याध्यक्ष अमृता रसाळ , कोषाध्यक्ष रामदास वरखडे , संघटक मंगेश वराळ , विश्वस्त ठकाराम लंके, अनिलराव शेटे , बबनराव लंके , रोहिदास लामखडे , संतोष रसाळ , इतर विश्वस्त , महानगर बँकेचे व्हाईस चेअरमन भास्करराव कवाद , माजी कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके , ज्येष्ठ नेते नामदेव थोरात , उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे , माजी सरपंच चंद्रकांत लंके , कॅप्टन विठ्ठलराव वराळ , सोमनाथ वरखडे , बाळासाहेब लामखडे , शिवाजीराव वराळ , गंगाराम लामखडे , सावकार लंके , अर्जुन वराळ , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .







