सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । मंगळवेढा नगरपालिका मतमोजणी वेळेस मंगळवेढा तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी काही गाड्यांचे सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाज काढत शहरामध्ये फिरत असताना. त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.
रविवारी दि.21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवेढा शहरात कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करून हुल्लडबाजी करणाऱ्या बुलेट, यामाहा, सुझुकी ई. मोटरसायकल चालकांविरुद्ध मंगळवेढा पोलीस उपविभागाचे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे सो, पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय बोरीगिड्डे सो यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गिरीष जोग, पोसई विजय पिसे, पोसई नागेश बनकर, वाहतूक विभागाचे पोहेकॉ/१४२१ संभाजी यादव, पोकॉ/१०६८ सुरज साळुंखे, पोहेकॉ/ ४०८ तुकाराम कोळी , पोहेकॉ/ १६२१ श्रीमंत पवार, पोहेकॉ/१६०३ गोरख कांबळे, पोकॉ/१२५८ चंद्रकांत सुतार, पोकॉ/१२२७ प्रेम दिवसे यांनी १२ मोटार सायकलस्वारांवर पोलीस स्टेशन येथे आणून दंडात्मक कारवाई केली आहे.
तसेच सदर गाड्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. यावेळी सपोनि जोग यांनी सदर मोटरसायकलस्वारांना यापुढे अशा प्रकारचे हुल्लडबाजी करताना आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी समज दिली आहे.







