सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । मंगळवेढा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 9850 मते घेऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा बबन अवताडे ह्या विजयी झाल्या आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप यांना 9638 मते मिळाले आहेत
दरम्यान नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच मतदाराने तरुण युवक युवतींना काम करण्याची संधी दिली आहे. प्रभाग क्रमांक तीन मध्ये विद्या गौरी अवघडे ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी 777 मताने विजयी झाल्या. मंगळवेढा नगरपरिषद शनिवारी २० डिसेंबर रोजी मतदान 69.77 टक्के इतके झाले होते त्याची मोजणी रविवारी सकाळी दहा वाजता शासकीय गोडाऊन मध्ये दहा टेबलच्या माध्यमातून सुरू झाली दरम्यान तीन तासात चार फेऱ्या पूर्ण करून सर्व निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. नगरपालिकेत भाजपाने खाते उघडले आहे
निवडणूक निकालानंतर नगराध्यक्ष व नगरसेवक विजय उमेदवारांनी श्री संत दामाजी पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करून गुलालाची उधळण करीत शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली परिणामी शहरातील रस्ते गोलालानेमाखून गेलेले चित्र होते निवडणूक निकालाच्या घोषणेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांच्या हस्ते सर्व विजय उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले मतमोजणीप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनीषा मगर यांनी काम पाहिले मतमोजणी प्रसंगी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात डी .वाय .एस .पी. डॉ. बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.







