शंभूराज अनिल आवारी यांच्या वाढदिवसानिमित्त रांधे येथे भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शंभूराज अनिल आवारी

पारनेर (प्रतिनिधी दीपक भिका वरखडे) | छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पावन मुहूर्तावर, श्री स्वामी समर्थ देवस्थान (रांधे) येथे देवस्थानचे संस्थापक अनिल रामचंद्र आवारी यांचे चिरंजीव कु. शंभूराज याच्या चौथ्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर आणि दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार काशिनाथ दाते सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

याप्रसंगी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. “युवकांनी शिक्षण आणि समाजकार्य या दोन्ही क्षेत्रांत आघाडीवर राहावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमादरम्यान आमदार काशिनाथ दाते सर यांनी श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या विकासासाठी मोठी घोषणा केली. “भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहाच्या कामास लवकरच मंजुरी देण्यात येईल आणि हेच शंभूराज बाळाला वाढदिवसाचे खरे गिफ्ट असेल,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. तसेच, अळकुटी ते रांधे या सुमारे १ कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला असून, या रस्त्याचे कामही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अत्यंत अल्प काळात हे देवस्थान संपूर्ण पारनेर तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे, अशा शब्दांत त्यांनी संस्थापक अनिल आवारी व सर्व सेवेकऱ्यांचे कौतुक केले.शंभूराज अनिल आवारी

‘पूना ब्लड सेंटर’च्या वतीने किरण औटी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर पार पडले, ज्यामध्ये अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. देवस्थान परिसरात भव्य महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे आयोजन श्री. भिमाजी घुले, डॉ. संदीप डफळ, श्री. युवराज ढवण, श्री. जितेंद्र राऊत, श्री. शंकर लामखडे, श्री. चंद्रकांत ढवण, श्री. महेंद्र शेटे, श्री. पंढरीनाथ वराळ, श्री. ज्ञानेश्वर निचित, श्री. संतोष ढवण, पत्रकार योगेश खाडे, श्री. दशरथ ढवण तसेच गं.भा. शालूबाई आवारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

या सोहळ्याला परिसरातील हजारो भाविकांसह श्री. वसंतदादा चेडे, श्री. रखमाजी कापसे सर, श्री. विकासशेठ पवार, मेजर नरसाळे, श्री. सुभाष भोसले, श्री. मच्छिंद्र टावरे, श्री. दत्तात्रय बाबर सर, श्री. भास्करशेठ जाधव, श्री. कैलासदादा आवारी, श्री. सतीश लामखडे, श्री. संतोष आवारी, श्री. संतोष खडके, दिलीप आवारी, श्री. दीपक मावळे, सौ. पुष्पाताई वराळ, सौ. सोनल आवारी, सौ. रेश्मा गलांडे, सौ. वर्षा भोसले, सौ. सारिका सरोदे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवर, रक्तदाते, अन्नदाते व सेवेकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण परिसर “श्री स्वामी समर्थ… जय जय स्वामी समर्थ” च्या गजराने भक्तिमय झाला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here