शिर्डी (प्रतिनिधी) । शिर्डी येथील साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सामाजिक बांधीलकी, पत्रकारिता आणि जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते यांच्या शुभहस्ते संजय महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या निर्भीड पत्रकारितेचे आणि सामाजिक कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी दत्तात्रय गोंदकर, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आसारामजी वारे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय महाजन हे अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडत असून, साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत उपस्थित मान्यवरांनी त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामुळे शिर्डीमधील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.







