मुंबई (उपसंपादक भगवंत शिंदे) । २३ डिसेंबर २०२५ रोजी जिजामाता सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोपरखैरणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेविका सौ. सायली नारायण शिंदे, माजी नगरसेवक श्री. केशव म्हात्रे तसेच गजानन चॅरिटेबल संस्थेचे सचिव डॉ. व्ही. टी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपली कला व सर्जनशीलता सादर केली. उपस्थित मान्यवरांनी शाळा व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले. हा कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.






