खटावच्या अंगणवाडी सेविकांसाठी सावित्रीबाई फुले काव्य स्पर्धा

सावित्रीबाई फुले

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) । तीन जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खटाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आणि मदतनीस यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्यावर जीवनावर आधारित तसेच स्त्रीया व बालिका यांच्या भाव विश्वावर आधारित काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजनेचे विस्ताराधिकारी यशेन्द्र क्षीरसागर यांनी दिली.

तीन जानेवारी रोजी बालिका दिन साजरा केला जातो. अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस उत्कृष्ट लेखन आणि काव्य करू शकतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यांच्या अंगभूत कलागुणांना नेहमीच्या कामकाजातून वाव मिळावा म्हणून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत .स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही .कविता लेखन जास्तीत जास्त पंचवीस ओळीत असावी. तीन जानेवारी पर्यंत कविता जमा करावी.सावित्रीबाई फुले यांचे कार्य, स्त्रियांचे जीवन ,बालिकांचे जीवन असे कवितेसाठी विषय आहेत. यापैकी एका विषयावर आपली कविता आपल्या संबंधित पर्यवेक्षिका किंवा तालुका कार्यालयात जमा करावी. नुकत्याच घेण्यात आलेल्या “स्कंदमाता निबंध स्पर्धा आणि काव्य स्पर्धा” यांचा एकत्र बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यातसाजरा होणार आहे.
या उपक्रमांसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती संगीता खाबडे आणि श्रीमती वर्षाराणी ओमासे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत आहे ,अशी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here