जिजामाता सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावी – बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

जिजामाता सेकंडरी

मुंबई (उपसंपादक भगवंत शिंदे) । जिजामाता सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोपरखैरणे येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आनंदी व आपुलकीच्या वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच गजानन चॅरिटेबल संस्थेचे सचिव डॉ. व्ही. टी. पाटील यांचीही उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने व निर्धाराने सामोरे जाण्यास प्रोत्साहित केले. हा निरोप समारंभ भावनिक व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here