ख्रिसमस पार्टीचे आमिष दाखवून १३ वर्षीय शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या वृध्दास अटक

बलात्कार
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । ख्रिसमस पार्टीचे आमिष दाखवून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाला पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी कुतबुद्दीन अली महंमद (वय ७२, रा. महंमदवाडी, हडपसर) याला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार महिला एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत. बुधवारी (२४ डिसेंबर) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपीने ‘ख्रिसमस पार्टी करायला घरी येशील का, तुला चॉकलेट देतो,’ असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर सदनिकेचा दरवाजा बंद करून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले.घाबरलेल्या पीडित मुलीने झालेला हा प्रकार आपल्या घरी सांगितल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here