जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | पोलीस अधीक्षक, जळगांव महेश्वर रेड्डी यांनी जळगांव शहरात घडणारे मोटार सायकलीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी पोउपनि. जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकॉ/हरीलाल पाटील, पोहेकॉ प्रविण मांडोळे, पोकॉ राहुल कोळी, चालक पोहेकों/दिपक चौधरी अशांचे पथक तयार करुन त्यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे वाबत सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने नमुद तपास पथक हे मोटारसायकल चोरीचे गुन्हयांचा तपास करीत असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन नमुद तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत आरोपी विकास चंपालाल बरडे रा. अंजनगाव ता. सेंधवा जि. बडवानी (मध्यप्रदेश) यास शिरपुर येथुन ताब्यात घेवुन त्यास मोटारसायकल चोरी बाबत सखोल विचारपुस केली असता त्याने जळगांव शहरातुन वेगवेगळया ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी विकास चंपालाल बरडे याने दिलेल्या कबुलीप्रमाणे मोटार सायकल चोरी बाबत अभिलेखाची पाहणी करता जळगांव शहर पो.स्टे. येथे १) गुरनं. ३९०/२०२५ BNS ३०३(२) २) ३८२/२०२४ BNS ३०३ (२) तसेंच रामानंदनगर पोस्टे. येथे ३) गुरनं. १५/२०२५ BNS ३०३ (२) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. नमुद तिन्ही गुन्हयातील चोरीस गेलेल्या ०३ मोटारसायकली हया नमुद आरोपी याचेक्हुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. नमुद आरोपी यास पुढील तपासकामी जळगांव शहर पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच पोउपनि, जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, पोहेकॉ संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोकों/राहुल कोळी, चालक पोहेकॉ दिपक चौधरी सर्व स्थागुशा जळगांव यांनी केली आहे.







