सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | खटाव तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी शेखर जाधव यांची तर सहखजिनदार पदी सचिन साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या हितासाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने यावेळी व्यक्त केला आहे संघाचे सचिव संकेत इंगळे, खजिनदारपदी स्वप्नील कांबळे, यांची निवड करण्यात आली आहे.
वडूज येथे झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या.उपाध्यक्षपदी नम्रता भोसले आणि अंकुश चव्हाण यांची निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी समीर तांबोळी, कोषाध्यक्ष म्हणून केशव जाधव काम पाहणार आहेत. प्रसिद्धी प्रमुखपदी शरद कदम यांची निवड करण्यात आली आहे. कायदे सल्लागार म्हणून ॲड. एकनाथ जाधव यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल नलवडे हे काम पाहणार आहेत. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, व्यावसायिक अडचणी सोडवणे, तसेच तालुक्यातील पत्रकारांमध्ये ऐक्य आणि समन्वय वाढवणे यासाठी संघ अधिक सक्रिय राहील, असा विश्वास नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खटाव तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रम राबवणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढवणे यावर भर देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. नवीन कार्यकारिणीला विविध स्तरातून शुभेच्छा देण्यात येत असून आगामी काळात संघ अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नागनाथ स्वामी, मावळते अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते.







