शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम यशस्वी; आपला मावळा संघटनेनेच्या शेकडो मावळ्यांनी केली स्वच्छता मोहीम

आपला मावळा

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) । आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली बागलाण तालुक्यातील साल्लेर येथील शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेला गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात आली होती.

दि २८ तारखेला भल्या पहाटे उठून आपल्या सोबत आलेल्या हजारो मावळे व स्थानिक शिवप्रेमी तरूणांना सोबत घेत अहिल्या नगर चे खासदार डॉ निलेश लंके, आणि दिंडोरी मतदार संघाचे आमदार भास्करराव भगरे, यांच्या नेतृत्वाखाली आपला मावळा संघटनेनेच्या पदाधिकारीऱ्यांनी संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तिन ते चार वाहनातून आणलेल्या साधन सामुग्री व इतर साहित्य आणुन संपूर्ण गड परिसरात साफसफाई करत एक किमी उंच पाय वाटेवरील खडतर व खडकाळ भाग सुलभ करण्यासाठी शेकडो मावळ्यांनी श्रमदान करून रस्ता पर्यटकांच्या दृष्टीने योग्य करन्यासाठी मुहूर्तमेढ रोवली, या वेळी डॉ निलेश लंके,खा भास्करराव भगरे, आ. संजय चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव तसेच, आपला मावळा संघटनेनेचे जिल्ह्यातील व अहिल्या नगर पुणे जिल्यासह नाशिक जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी मावळे सहभागी झाले होते.आपला मावळा
किल्ल्याच्या संवर्धनासाठी, तसेच शेकडो वर्षे जुने असलेल्या पुरातन मंदिरांच्या जिर्णोद्धार करण्यात आला पाहिजे, त्यासाठी पूरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी व खा, भगरे सर यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार कडे पाठपुरावा सुरूच राहील,खा डॉ निलेश लंके यांनी आपल्या सोबत,सुचना फलक,मोठेडसबिन पर्यटकांना बसण्यासाठी आकर्षक बाकडे,झाडु,टिकाव, फावडे इत्यादी साहित्य आणुन दिवसभर स्वच्छता मोहीम राबविली, किल्याच्या वाटेवरील सुर्याजी राव काकडे यांच्या समाधीच्या आजु बाजुच्या परिसराची स्वच्छता करुन तेथे असलेल्या स्मारकासमोर असलेल्या चौथऱ्यावरील उंच स्तंभावर भगवा ध्वज फडकवन्यात आला. आपला मावळा
जवळच असलेल्या कुलस्वामिनीच्या मंदिर प्रांगणात एकत्र येऊन तेथे सर्वच शिवप्रेमी तरूणांनी आई जिजाऊची प्रार्थना व गडकोटांच्या संवर्धनकरन्यासाठी शपथ देण्यात आली, पुढे किल्ल्यावर जावुन स्वच्छता मोहीम राबवुन मोहीमेची यशस्वी सांगता करण्यात आली, या वेळी साल्हेर गावातील शेकडो तरुण तसेच शासकिय आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते, शासकिय आश्रम शाळा प्रशासनाने मोफत रात्रीच्या निवासाची व्यवस्था केली होती, ग्रामसेवक भामरे व सरपंच भोये यांनी पुर्ण वेळ हजर राहून स्वच्छता मोहीमेत सह भागी होत खारीचा वाटा उचलला,.
यावेळी आपला मावळा संघटनेनेचे जिल्हा समन्वयक समीर जी वडजे, बागलाण तालुका संघटक मुन्ना मांडवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे केशव मांडवडे, दिनेश सोनवणे, मेघराज जाधव , दिलीप सावळे पाटील, विस्वास निकम, ग्रामपंचायत प्रशासक नितीन देशमुख, ग्रामसेवक किशोर भामरे,मा संरपंच राणी ताई भोये, मधुकर भोये, भास्करराव बच्छाव, शशीकांत मयुर जी भोये, नाना शिंदे, आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते, विशेष बाब म्हणजे बागलाण तालुक्यात सद्या चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री सुनिल भाउ महाजन यांनी शेकडो मावळ्यांची उत्त्क्रुष्ट नास्त्याची व , जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोय केली होती, या वेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीं तसेच बागलाण अकेडमीचे संचालक महाले,याचा ही खा, निलेश लंके व खा, भास्करराव भगरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आपला मावळा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here