राजकारणातील नवीन चेहरा : कु. पूर्वा प्रदीप ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पूर्वा प्रदीप ठाकूर

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, राजकारणातील नवीन चेहऱ्यांपैकी एक असलेल्या युवा इच्छुक उमेदवार कु. पूर्वा प्रदीप ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांनी आपल्या सर्व समर्थकांसह महानगरपालिकेत उपस्थित राहून भारतीय जनता पार्टी (BJP) कडून उमेदवारीचा अर्ज सादर केला.

प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी:
कु. पूर्वा प्रदीप ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून भाजपची उमेदवारी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप यंदा तरुण, तडफदार आणि नवीन उमेदवारांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत असून, पूर्वा ठाकूर या त्यापैकीच एक महत्त्वाचा युवा चेहरा आहेत. विकासाचे ध्येय: प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय समोर ठेवून ही निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते, ज्यातून त्यांच्या समर्थकांचा उत्साह दिसून आला. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि विकासाची कामे तळागाळापर्यंत पोहोचवणे ही आपली प्राथमिकता असल्याचे कु. पूर्वा ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here