जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) | आज दि. 9 जानेवारी 2026 रोजी विद्यालयात शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या निधीतून शाळेस प्रोजेक्टर भेट देण्यात आले.
त्यानिमित्ताने आप्पासाहेब संभाजी पाटील (मा.अध्यक्ष- ज.जि.मा.पतपेढी जळगाव), दादासाहेब हरिभाऊ मुंडे (स्विय सहाय्यक – मा.आमदार किशोर भाऊ दराडे), दादासाहेब राजेंद्र पाटील (अध्यक्ष – मुख्याध्यापक संघ एरंडोल तालुका), भाऊसाहेब श्री. सानप सर(एरंडोल तालुका समन्वयक) इ. मान्यवर उपस्थित होते. आप्पासाहेब संभाजी पाटील यांनी आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या कार्याविषयी माहिती दिली. प्राध्यापक सुनिल गरुड यांनी शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांचे फोनवरून आभार मानले.
आमदार निधीतून शाळेस शैक्षणिक साहित्य (प्रोजेक्टर) भेट दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत विजय पाटील, आबासाहेब डी.बी.पाटील (प्रशासकिय अधिकारी), प्राध्यापक सुनिल गरुड सर(शिक्षण संचालक), शाळेचे मुख्याध्यापक एच.बी.पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने आभार मानले.








