गांव तेथे लोक क्रांती सेनेची स्थापना करणार-नगरसेवक शशिकांत लोळगे

क्रांती सेने

धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी) । प्रभागात विकासाची कामे करत असतांना शहरातील नागरीकांच्या अडीअडचणी सोडवून गांव तेथे लोक क्रांती सेनेची स्थापना करणार असल्याचे राहता नगर परीषदेचे लोक क्रांती सेना पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक शशिकांत लोळगे यांनी लोक क्रांती सेना पक्षप्रमुख बापूसाहेब देवेंद्र पाटील यांना अश्वासीत केले.

यावेळी पक्षप्रमुख बापूसाहेब देवेंद्र पाटील यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी लोक क्रांती सेनेचे जेष्ठ मार्गदर्शक नानासाहेब विजय राऊत,लोक क्रांती उद्योजक सेनेचे प्रदेशाध्यक्ष गुलाबराव माळी,लोक क्रांती सेनेचे उपनेते बाळासाहेब आंबेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विकासाच्या मुद्द्यावर आपण नगर परिषद प्रशासनाला योग्य ते सहकार्य करु.दिलेली आश्वासने पूर्ण करत असतांना विकला जाणार नाही,वाकणकर नाही बेशिस्त वागणाऱ्यांना शिस्त लावल्याशिवाय राहणार नाही.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत लोक क्रांती सेना पक्ष आपला सक्रिय सहभाग नोंदवेल असा ठाम विश्वास लोक क्रांती सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक शशिकांत लोळगे यांनी यावेळी व्यक्त केला.जिल्हा परिषद निवडणूकी संदर्भात लोक क्रांती सेना पक्ष ईच्छुक उमेदवारांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here