सातारा शहर पोलिसांनी ९ लाख ६० हजार किंमतीचे चोरीचे ५३ मोबाईल केले हस्तगत

सातारा

सातारा (उपसंपादक अर्जुन मोरे) | शहरातून गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सातारा शहर डी.बी. पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डी.बी. पथकाने सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्र व परराज्यातून सातारा शहरात गहाळ झालेले ९ लाख ६० हजार किंमतीचे ५३ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांचे प्रवासात बसस्टॅण्ड, बाजारपेठ व इतर कारणाने मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी नेहमीच प्राप्त होत असतात. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र व इतर राज्यातील भागातून गहाळ झालेले मोबाईल प्राप्त करून तक्रारदारांना परत केले आहेत. सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने जानेवारी २०२५ पासून २४४ विविध कंपन्यांचे मोबाईल फोन मूळ तक्रारदारांना परत केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोहवा सुजित भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रविण तडव, पोना पंकज मोहिते, पोकॉं तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, अभिषेक डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रशांत मोरे, रणजित कुंभार, ओमकार डुबल, यशवंत घाडगे, राकेश घाडगे, रामदास भास्करवाड यांनी यशस्वी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here