ठाणे प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारांचे दिव्यशक्ती प्रदर्शन

ठाणे

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्रमांक ७ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पायल मस्के ,अजय सकपाळ ,संतोष निकम यांचा आज प्रभाग क्रमांक सात येथे भव्य दिव्यशक्ती प्रदर्शन करण्यात आले.

प्रभागातील नागरिकांनी या प्रचार रॅलीत मोठा पाठिंबा दर्शवला संतोष निकम यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की विभागांमध्ये पार्किंग व्यवस्था त्याचबरोबर आरोग्यवस्था हा मोठा प्रश्न असून निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये यावरती काम करेल.
त्याचबरोबर पायल मस्के यांनी युवकांना रोजगार त्याचबरोबर कचरा वेचक महिलांच्या घरातील मुलांना शिक्षण आरोग्य अशा गंभीर विषयावरती आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये काम करेल आणि अजय सपकाळ यांनी बोलताना सांगितले की विभागांमध्ये 5000 घर आहेत आणि प्रत्येकी घरांमध्ये गाड्या असल्यामुळे पार्किंग व्यवस्था ही नसून पार्किंग व्यवस्था करेल त्याचबरोबर रॅलीला आलेल्या नागरिकांनी आपले विचार प्रसाद माध्यमासमोर मांडले.

ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here