सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम आणि प्रशासकीय तयारीची माहिती देण्यात आली. या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शिल्पा ओसवाल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी मार्गदर्शन केले.
निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला मंगळवेढ्याचे डीवायएसपी (DYSP) शिवपुंजे साहेब आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत निवडणूक आचारसंहिता: निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, डीवायएसपी शिवपुंजे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई आणि निवडणूक काळात होणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवणार आहे. “लोकशाहीचा हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस या पत्रकार परिषदेमुळे मंगळवेढा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता आगामी निवडणुकीकडे लागले आहे.







