भारतीय जनता पार्टीचे रोहन वसंत मोरे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

रोहन वसंत मोरे

पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) | शहरातील अगोदर गटनेतेपदी निवड झालेल्या सदस्यांच्या सत्कार करण्यात आला.रोहन वसंत मोरे यांची एकमताने बिनविरोध उपनगराध्यक्ष निवड करण्यात आली. व स्वीकृत शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र मोतीलाल कासार व भारतीय जनता पार्टीचे गोपाल मुरलीधर दाणेज व शिवसेना पक्ष आघाडी मनीषकुमार भाईदास पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

उपनगराध्यक्ष रोहन मोरे यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला व नगरसेवकांच्या आज १२ वाजेला नगरपालिकेची विशेष – सभा घेण्यात आली . सभेत तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक – पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने या पदावर कोणाची वणी लागते याकडे शहराचे लक्ष लावलेले होते .
नगरपालिकेत भाजपकडे १२ तर शिवसेना शिंदे गटाकडे नगराध्यक्षांसह आठ नगरसेवक आहे. त्यांना जनाधार आघाडीच्या तीन व दोन अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेना शिंदे गटाकडे १३ नगरसेवक आहे. तसेच नगराध्यक्षांना एक मत देण्याच्या विशेष अधिकार राज्य सरकारने दिल्याने त्याचा लाभ सत्ताधारी गटाला मिळेल, नगरपालिकेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काही उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाले होते, तसेच काही उमेदवारांना तिकिट वाटप वेळी स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द देण्यात आला आहे. मात्र स्वीकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागते याकडे शहरवासी यांचे लक्ष लागलेले होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here